यवतमाळ : येथेही जिल्ह्यात २५ मंदिरांमध्ये सामूहिक मंदिर स्वच्छतेचा उपक्रम घेण्यात आला. हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी आणि परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी १८ मंदिरांमध्ये देवाला साकडे घालण्यात आले, तर ३ ठिकाणी ‘साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
मिळालेला प्रतिसाद
१. यवतमाळ येथे जिनातील गणपति मंदिर स्वच्छतेसाठी धर्मशिक्षण वर्गातील १६ महिला सहभागी झाल्या. मंदिर स्वच्छतेनंतर आनंद अनुभवल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी अन्य दोन मंदिरांची स्वच्छता करण्याचे दायित्व घेतले.
२. श्री गजानन महाराज मंदिराची स्वच्छता केल्यावर तेथील पुजार्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
३. नेर येथे वारकरी संप्रदायाच्या १४ महिला मंदिर स्वच्छतेत सहभागी झाल्या. नंतरही त्यांनी मंदिर स्वच्छतेच्या उपक्रमासाठी बोलावण्यास सांगितले. या वेळी उपस्थितांनी सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
४. पिंपळगाव येथे विठ्ठल मंदिरात ७ वयस्कर महिला मंदिर स्वच्छ करण्यासाठी सहभागी झाल्या.
वैशिष्ट्यपूर्ण : सार्वजनिक माता मंदिरात स्वच्छतेसाठी १३ महिला सहभागी झाल्या. त्यांनी ‘स्वच्छतेनंतर मंदिरातील देवीचे मुख हसरे दिसत होते’, असे सांगितले.