Menu Close

आरोपी पाद्य्रांची नावे दडपणार्‍या व्हॅटिकनच्या विरोधात पीडितांकडून खटला प्रविष्ट

चर्चमधील पाद्य्रांकडून होणार्‍या मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

हे आहे व्हॅटिकनचे खरे स्वरूप ! गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या व्हॅटिकनच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमे एकही वृत्त देत नाहीत; मात्र हिंदूंचे संत आणि आश्रम, तसेच मठ यांच्या विरोधात खोट्या बातम्या प्रसारित करतात, हे लक्षात घ्या !

सेंट पॉल (अमेरिका) : अमेरिकेतील ३ भाऊ आणि २ अन्य व्यक्ती यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या ख्रिस्ती धर्मगुरूंची कृत्ये दाबून ठेवली म्हणून व्हॅटिकनविरुद्ध खटला प्रविष्ट केला आहे. तसेच सेंट पॉलमधील न्यायालयात १४ मे या दिवशी प्रविष्ट करण्यात आलेल्या खटल्याद्वारे व्हॅटिकनने लैंगिक अत्याचार करणार्‍या ३ सहस्र ४०० पेक्षा अधिक पाद्य्रांची ओळख आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे, तसेच आरोपींवर जगभरातील पोलिसांत गुन्हे नोंदवून तेथील न्यायालयात खटले चालवण्यात यावेत, अशी विनंती केली आहे.

१. वर्ष २००६ ते २०१२ या कालावधीत वरील ३ भावांवर माजी पाद्री कर्टीस वेहमेयर याने लैंगिक अत्याचार केले होते. १९८० च्या दशकाच्या प्रारंभी माजी पाद्री थॉमस अ‍ॅडमसन यांनी चौथ्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केला होता आणि पाचवी व्यक्ती कॅलिफोर्नियामध्ये वर्ष १९७८ ते १९८४ या कालावधीत माजी पाद्री फिडेन्सियो सिल्वा-फ्लोरेस यांच्या अत्याचारास बळी पडली.

२. अमेरिकेतील बिशपच्या कॅथलिक कॉन्फरन्सने या चिंताजनक घटनांची नोंद घेऊन अहवालात म्हटले आहे की, वर्ष १९५० ते २०१६ या काळात अमेरिकेतील  ६ सहस्रांहून अधिक पाद्य्रांवर अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. (इतक्या मोठ्या संख्येने पाद्य्रांकडून होणारे अत्याचार पहाता चर्च म्हणजे ‘वासनांधांचे ठिकाण’ आणि पाद्री म्हणजे ‘वासनांध व्यक्ती’ असे कोणी म्हटल्याच चुकीचे कसे ठरेल ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. वर्ष २००४ मध्ये व्हॅटिकनच्या एका अहवालात ३ सहस्र ४०० पेक्षा अधिक प्रकरणे गैरवर्तनाची नोंदवण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व पाद्य्रांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे; मात्र त्यांची नावे आणि तपशील कधीही सार्वजनिक केले गेले नाहीत. (लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पदावरून काढून टाकणे ही शिक्षा पुरेशी नाही, तर त्यांना कारागृहात डांबून शिक्षा करणे महत्त्वाचे आहे ! व्हॅटिकन अशा प्रकारे थातुरमातुर कारवाई करून पाद्य्रांना पाठीशी घालत असल्यामुळेच लैंगिक शोषणाचे प्रकार थांबलेले नाहीत, हे स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *