फोंडा (गोवा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्या आघातांचा प्रतिकार अन् हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. अधिवेशनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
२७ आणि २८ मे २०१९ : अधिवक्ता अधिवेशन
२८ मे २०१९ : उद्योगपती अधिवेशन
२९ मे ते ४ जून २०१९ : अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन
५ ते ८ जून २०१९ : चतुर्थ हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशन
अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !
अधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशूरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे. या धर्मदानावर ‘आयकर कायदा, १९६१’ नुसार ‘८० जी (५)’ खाली आयकरात सूट मिळू शकते. अर्पणदाते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. धनादेश हिंदु जनजागृती समितीच्या नावे स्वीकारले जातील.
धर्मदानासाठी विवरण
बँकेचे नाव : Bank of Baroda शाखेचे नाव : मिरज
बचत खात्याचा क्रमांक : 04400100016838 नाव : हिंदु जनजागृती समिती
आयएफ्एस्सी क्रमांक : BARB0MIRAJX
विशेष सूचना
धर्मदान म्हणून बँकेत निधी जमा केल्यानंतर त्यासंबंधीची तपशीलवार माहिती [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावी किंवा श्री. सुरजित माथुर यांना ८२०८३३२८५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.