नंदुरबार – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम राबवण्यात आले.
मंदिर स्वच्छता
५ मे या दिवशी वावद येथील श्री भवानीमाता मंदिर आणि श्रीराम मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञाही करण्यात आली आणि साकडेही घालण्यात आले. यात २८ धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. या वेळी सर्वश्री राकेश कोळी, गोपाल राजपूत, पंकज राजपूत, तेजस राजपूत, जितेंद्र मराठे, दादू राजपूत या धर्मप्रेमींसह १६ जण सहभागी झाले होते.
स्मारक स्वच्छता
१२ मे या दिवशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी २ साधकांसह ३ धर्मप्रेमी उपस्थित होते.
शौर्य जागरण शिबिर
१४ मे या दिवशी जिल्हा परिषद शाळा, आसाने; १५ मे या दिवशी जिल्हा परिषद शाळा, आस्टे; वीर सावरकर नगर परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक ४ च्या मैदानावर; १६ मे या दिवशी मारुति मंदिर मैदान, ढंढाणे येथे युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात हर्षद खानविलकर, डॉ. नरेंद्र पाटील यांनी ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी आकाश गावित, जितेंद्र मराठे, हिरालाल पाटील आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
शिबिरात लाठी काठी, नानचाकू, कराटेच्या विविध प्रकारांची प्रात्यक्षिके दाखवून काही प्रकार शिबिरार्थींकडून करून घेण्यात आले.