मंदिर न्यास आणि महंत युगल किशोर दास यांनी इफ्तार पार्टीच्या आयोजनासाठी घेतला पुढाकार !
- हिंदूंच्या दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये एखादी मेजवानी आयोजित का करण्यात येत नाही ? धार्मिक सौहार्द टिकवण्याचा किंवा दाखवण्याचा ठेका केवळ हिंदूंनी घेतला आहे का ?
- केवळ जन्महिंदूंनाच नव्हे, तर धर्माधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्या महंतांनाही धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
अयोध्या : येथील श्री सीताराम मंदिरामध्ये मंदिर न्यासाकडून मुसलमानांसाठी सलग तिसर्या वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुसलमानांसमवेत काही साधू आणि संत, तसेच शीखही सहभागी झाले होते. या वेळी सर्वांना खजूर आणि प्रसादाचे लाडू वाटण्यात आले. इफ्तार पार्टीत धार्मिक सौहार्द टिकवण्यासाठी शपथ घेण्यात आली. तसेच इफ्तारनंतर मुसलमानांनी मंदिराच्या प्रांगणात नमाजपठण केले. (एखाद्या मशिदीमध्ये किंवा चर्चमध्ये एकादशीच्या दिवशी किंवा एखाद्या हिंदूंच्या सणाच्या वेळी भजन, कीर्तन किंवा सामूहिक नामजप करण्यात आल्याचे कधी ऐकले आहे का ? गोमांसभक्षण करणार्यांना मंदिराच्या प्रांगणात नमाजपठण करण्याची मुभा देऊन मंदिराचे पावित्र्य भंग करणार्यांना हिंदूंनी वैध मार्गाने खडसावणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
(म्हणे) ‘अयोध्या कोणत्याही एका धर्मियांचे शहर नाही, तर सर्वांसाठी पुण्यनगर आहे !’ – महंत युगल किशोर दास
- असे व्हॅटिकन, मक्का आणि मदिना यांच्याविषयी कोणी बोलतात का ?
- जेथे मुसलमान बहुसंख्य असतात आणि हिंदू अल्पसंख्य असतात तेथे हिंदूंना राहू दिले जात नाही. काश्मीरमधून अल्पसंख्यांक हिंदूंना मशिदींतून धमक्या देऊन पळवून लावण्यात आले होते, तर अयोध्येत मंदिरांमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली जाते, यावरून कोण सहिष्णु आणि कोण असहिष्णु आहे, हे स्पष्ट होते !
मंदिराचे महंत युगल किशोर दास यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. ते म्हणाले की, मंदिर न्यासाकडून सलग तिसर्या वर्षी इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे. पुढेही आम्ही याचे आयोजन करत रहाणार आहोत. आम्ही धार्मिक सौहार्द दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला पाहिजे. (नेहमी हिंदूंनीच असा प्रयत्न का केला पाहिजे ? अन्यांना धार्मिक सौहार्द का दाखवावासा वाटत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अयोध्येत अल्पसंख्यांक असूनही आम्हाला कधी भीती वाटत नाही ! – मुजम्मिल फिजा
या इफ्तार पार्टीत सहभागी झालेले मुजम्मिल फिजा म्हणाले की, देशात एकीकडे धर्माच्या नावावरून राजकारण केले जात असतांना महंत युगल किशोर दास यांनी धार्मिक सौहार्दाचे एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. (असे प्रयत्न मौलाना, मुफ्ती किंवा जामा मशिदीचे इमाम का करत नाहीत ? हा प्रश्न मुजम्मिल फिजा यांनी स्वपंथातील पंथगुरूंना विचारावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आम्ही प्रतिवर्षी हिंदूंसमवेत नवरात्री साजरी करतो. (असे हिंदूंसमवेत सण साजरे करणारे मुसलमान तुरळक आहेत. त्याही पुढे जाऊन असे ‘धर्मनिरपेक्ष’ मुसलमान मशिदी अथवा दर्गे यांठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्याचे धारिष्ट्य करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात