बेळगाव : येथे झालेल्या दिंडीच्या प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पंकज घाडी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै चौक येथे धर्मध्वज पूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. यल्लाप्पा पाटील यांनी शंखनाद केला. बेळगाव येथील वैष्णवी नृत्यालयाच्या सौ. माधुरी बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कु. सौंदर्या जगनूर, कु. प्राची पत्रावळी, कु. प्रगती हिरेमठ यांनी अत्यंत भावपूर्णरित्या भरतनाट्यम् नृत्यसेवा सादर केली. बॅरिस्टर नाथ पै चौक येथून प्रारंभ झालेल्या दिंडीचा श्यामाप्रसाद मुखर्जी रोड येथील रेणुका उपहारगृहासमोर समारोप करण्यात आला. दिंडीत सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांसह ४०० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. उज्ज्वला गावडे आणि समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा, तसेच श्री. भुजंग चव्हाण यांनीही त्यांचे विचार मांडले.
क्षणचित्र
दिंडी पाहून रस्त्यावरील लोक भ्रमणभाषमध्ये तिचे चित्रीकरण करत होते.
अशी झाली हिंदू एकता दिंडी !
दिंडीमध्ये नंदिहळ्ळी येथील वारकरी, बेळगाव येथील स्वामी समर्थ संप्रदायाचे कार्यकर्ते, तसेच धामणे येथील श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे युवा कार्यकर्ते, धर्मप्रेमी महिला, बेळगाव येथील कुरबर समाजाचे काडसिद्धेश्वर गायन संघाचे सदस्य आपल्या पारंपरिक ढोल पथकासह दिंडीत सहभागी झाले होते. रायबाग येथील तायक्वांदो कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनी कराटे आणि स्वरक्षणाचे काही प्रकार सादर केले. दिंडीतील रणरागिणी शाखेच्या युवती या झाशीची राणी, कित्तुरची राणी यांच्या वेशात होत्या, तर युवकांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून त्याविषयी समाजामध्ये जागृती निर्माण केली. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या वेशभूषेतील बालक दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. खानापूर, तसेच गोकाकच्या महिलांनी पारंपरिक फुगडी खेळून वातावरणातील उत्साह वाढवला.
दिंडीच्या मार्गावर हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल कुरणकर यांनी सपत्नीक शहापूर महादेव मंदिराच्या समोर, तसेच धर्मप्रेमी श्री. सागर केरू यांनी सपत्नीक ‘बँक ऑफ इंडिया’ चौक येथे धर्मध्वजाचे पूजन केले.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्य अद्भुत अन् प्रशंसनीय ! – पंकज घाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म अन् अध्यात्मप्रसार यांचे कार्य करत आहेत. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी सर्व मावळ्यांना एकत्रित केेले, त्याचप्रमाणे हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी देशाच्या कान्याकोपर्यापर्यंत पोेचून हिंदूंना धर्मकार्यात सहभागी करून घेत आहे. समिती आणि संस्था यांचे हे कार्य अद्भुत आणि प्रशंसनीय आहे. दिंडीमध्ये मला धर्मध्वजाचे पूजन करण्याचे भाग्य लाभले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या व्यापक कार्यात सहभागी होण्याची संधीही मिळाली, याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
पोलिसांविषयी आलेले अनुभव
- दिंडी लवकर पुढे जावी, यासाठी पोलीस घाई करत होते. (अन्य धर्मियांच्या मिरवणुकीत अशी घाई पोलिसांनी केली असती का ? – संपादक)
- एका पोलिसाने ‘तुम्ही गुरूंचे कार्य दाखवत आहात, तर कराटे आणि प्रात्यक्षिके दाखवण्याची काय आवश्यकता आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. (काळाची आवश्यकता लक्षात न घेता हिंदुद्वेषापोटी अशी विधाने करणारे पोलीस ! – संपादक)