नंदुरबार : पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, दुधात भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई करावी, भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्यांना भारतातून हाकलून द्यावे, लहान मुलांना भ्रमणभाषमध्ये अश्लील चलचित्र आणि हिंसक दृश्य उपलब्ध करून देणार्या ‘वेब सिरीज’वर बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात १८ मे या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात ४० धर्मप्रेमी सहभागी झाले. सूत्रसंचालन श्री. आकाश गावित यांनी केले.
दुधात भेसळ करून मानवी जीवनाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी ! – कपिल चौधरी, स्वदेशी विकास मंच
दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. महाराष्ट्रात २ लाख लिटर प्रतिदिन पाणी टाकून दुधाची भेसळ होते. त्यामुळे ग्राहकांना उच्च दर्जाचे दूध मिळत नाही. महाराष्ट्रात प्रतिदिन १ कोटी १५ लाख लिटर दुधाचे संकलन होते. दुधाचा फॅट वाढावा म्हणून त्यात ग्लिसरीन मिसळले जाते. तसेच वनस्पती तूप, स्टार्च, युरिया, ग्लुकोज, मालटोडेक्स्ट्रिन, दूध पावडर, सेल्युलोस, खाद्यतेल, डिटर्जंट पावडर आदी मिसळून भेसळ केली जाते. या भेसळीच्या माध्यमातून मानवी जीवनाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पेट्रोल पंपांवरील पेट्रोल-डिझेलचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करून फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे मत हिंदु जनजागृती समितीचे सतीश बागुल यांनी व्यक्त केले. या वेळी समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.