संभाजीनगर : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम, स्मारक स्वच्छता उपक्रम, देवाला साकडे घालणे, तसेच साधनेविषयीची प्रवचने असे विविध उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले.
मंदिर स्वच्छता आणि देवाला साकडे घालणे
संभाजीनगर येथील दक्षिणमुखी मारुति मंदिर, श्री रेणुकामाता मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री भवानीदेवी मंदिर, स्वानंद गणपति मंदिर, श्री सिद्धीविनायक गणेश मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अशा एकूण २२ मंदिरांत साकडे घालण्यात आले, तर १० मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. साकडे घालतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, अशी प्रार्थना करण्यात आली.
साधनेविषयीची प्रवचने
संभाजीनगर जिल्ह्यात २१ ठिकाणी सौ. राजश्री कुलकर्णी, सौ. माधुरी कुलकर्णी, सौ. कीर्ती नागपूरकर, सौ. सुलभा सुरडकर यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले.
स्मारक स्वच्छता उपक्रम
१३ मे या दिवशी बन्सीलाल नगर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची स्वच्छता करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली. या वेळी २३ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
क्षणचित्रे
- या वेळी शिवसेना शहराध्यक्ष श्री. विजय वाघचौरे यांनी संस्था आणि समिती यांचे कार्य जाणून प्रशंसा केली. ‘अधिकाधिक हिंदूंनी अशा उपक्रमांत सहभागी व्हावे’, असे त्यांनी आवाहन केले.
- या वेळी एका महाविद्यालयीन युवतीने समितीचे कार्य जाणून घेऊन कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.