परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान
फरिदाबाद (हरियाणा) : शिवशक्ती मंदिर प्रबंधक समितीच्या वतीने येथे ७ दिवसीय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, याकरता सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. या प्रसंगी कथावाचक तथा शिवशक्ती मंदिरचे मुख्य पुरोहित आचार्य राघवेंद्र आणि मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे हरियाणा आणि पंजाब समन्वयक श्री. सुरेश मुंजाल म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवण्यात येत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १९९८ या वर्षी २०२३ मध्ये ईश्वरी राज्याची स्थापना अर्थात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असे घोषित केले होते. त्या वेळी देशात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने कोणतेही आशादायी वातावरण नव्हते; मात्र आता आपण देशाची हिंदु राष्ट्राच्या दिशेने होत असलली वाटचाल प्रत्यक्ष अनुभवत आहोत.’’