Menu Close

ओवैसीसारख्यांची संख्या वाढली, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील : सुशील तिवारी, स्वराज्य हिंदू सेना

‘भारतमाता की जय’ च्या घोषणा देत भिवंडी येथे हिंदुत्ववादी संघटनांची असदुद्दीन ओवैसींना निलंबित करण्याची मागणी !

bhivandi_5

भिवंडी : आज ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही असे म्हणणारे ओवैसी दोघेच आहेत, पण उद्या यांची संख्या वाढली, तर भारताची अवस्था काय होईल, याचा विचार करायला हवा. आपण आज संघटित झालो नाही, तर भविष्यात आपल्याला गंभीर परिणाम भोगायला लागतील आणि आपण असेच संघटित होत राहिलो, तर भविष्यात भारताला हिंदु राष्ट्र बनवणे शक्य आहे, असे उद्गार स्वराज्य हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुशील तिवारी यांनी येथे काढले. २० मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता भिवंडी येथील टेमघर पाईपलाईन नाक्याजवळ आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी विविध संघटनांच्या वतीने ११० हिंदू सहभागी झाले होते.

Bhivandi1मी भारतात जन्माला आलो असलो तरी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही असे देशद्रोही फुत्कार काढणार्‍या असदुद्दीन ओवैसींना भारतमातेचा अवमान केल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात यावे अशी मागणी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांच्या गजरात समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी केली. टेमघर ग्रामस्थांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात वरील मागणी समवेतच इतर मागण्याही करण्यात आल्या. या वेळी ग्रामस्थ मंडळ टेमघर पाडा भादवड, विश्‍व हिंदू परिषद, वारकरी संप्रदाय, बजरंग दल, मानव हित सेवा संघ, माउली मित्र मंडळ, मंगलमूर्ती फाऊंडेशन, स्वराज्य हिंदू सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटना सहभागी झाल्या.

प्रत्येक हिंदूने संप्रदाय बाजूला सारून आज एक हिंदू म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता आहे !  – ह.भ.प. चिंतामणी महाराज, भिवंडी जिल्हा अध्यक्ष, विश्‍व हिंदू परिषद

आज हिंदु धर्मावरील अत्याचारांच्या विरोधात आपण सर्व एक हिंदू म्हणून सर्व संप्रदाय बाजूला सारून येथे एकत्र आलेले आहोत. अशा प्रकारे ज्या वेळेला हिंदूंवर अत्याचार होतील त्या वेळेला एक हिंदू म्हणून आपण एकत्र आले पाहिजे.

ओवैसी सारख्या देशद्रोह्यांचा निषेध करतो ! – ह.भ.प. विठ्ठल नाईक, वारकरी संप्रदाय

आज आम्ही सर्व संस्था आणि तरुण येथे ओवैसीसारख्या देशद्रोह्यांचा निषेध करत आहोत, ज्या कोणाच्या शरीरामध्ये ओवैसीसारखे देशद्रोही रक्त वाहत नसेल त्या प्रत्येकाने ‘भारतमाता की जय’ बोललेच पाहिजे.

केवळ हिंदूंच्याच सणाला विरोध करणे ही निधर्म्यांची नीती आहेे ! – मनोज जोशी, कोकण प्रांत धर्माचार्य, विश्‍व हिंदू परिषद

आज प्रसारमाध्यमे जो खोटा प्रसार करून हिंदु धर्माचा आणि हिंदु संतांचा हेतुपुरस्सर अवमान करीत आहेत, त्यामागे हिंदूंच्या मनामध्ये हिंदु धर्माविषयी घृणा निर्माण व्हावी आणि त्यांचे धर्मांतर करणे सोपे जावे, असे मोठे षड्यंत्र आहे. केवळ हिंदूंच्याच सणाला विरोध करणे ही निधर्म्यांची नीती आहे. ज्या धर्मात मी जन्म घेतलाय त्या धर्मासाठी मी वेळ देऊ शकलो नाहे, तर ती माझ्यासाठी शरमेची गोष्ट आहे.

हिंदुद्रोही लेखक डॉ. यारल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याचा सर्व जनतेने विरोध केला पाहिजे ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

यज्ञकुंडातून जन्म झालेल्या द्रौपदी या देवीचे बीभत्स वर्णन करणार्‍या पुस्तकावर बंदी आणायचे सोडून शासन याचे लेखक डॉ. यारल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना पद्मभूषण पुरस्कार द्यायला निघाले आहे. आज मलेशियामध्ये हिंदूंची ओळख मुसलमान अशी करून दिली आहे, आज ते हिंदू असूनही कागदोपत्री मुसलमान आहेत. आज जे मलेशियामध्ये घडत आहे, ते उद्या भारतातही घडू शकते.

संविधानात लिहिले नसतांनाही हजसाठी अनुदान कसे घेता ? – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

ओवैसी म्हणतात की, संविधानामध्ये लिहिले नाही की ‘भारतमाता की जय’ असे म्हणा, म्हणून आम्ही म्हणणार नाही. मग संविधानात लिहिले नसतांनाही मशिदींवरील अनधिकृत भोंगे कसे वापरता, हजसाठी अनुदान कसे घेता ? हिंदूंनी केवळ शिवजयंतीनिमित्त वर्षातून एकदाच नाही तर प्रत्येकच आठवड्याला किमान एकदा तरी एकत्र येणे आवश्यक आहे.

भारताचे खाऊन पाकिस्तानचा जयजयकार करणारे हे लोक बंडखोर आहेत ! – सौ. प्रेमा यशवंत नाईक, वारकरी संप्रदाय

क्षणचित्रे

१. कु. जय समर्थ नाईक या ७ वर्षांच्या मुलानेही आंदोलनामध्ये हस्तफलक घेऊन निषेध केला.
२. आंदोलनाचा आरंभ ह.भ.प. चिंतामणी महाराजांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेच्या पूजनाने झाला.

टेमघर गावातील पुढील धर्माभिमान्यांनी प्रसार, झेंड्यांची व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, स्वाक्षर्‍या घेणे, पाणी व्यवस्था आदी आंदोलनाच्या सेवा उत्स्फूर्तपणे केल्या. – सर्वोत्तम ठाणगे, सागर तरे, चेतन पाटील, हरेश नाईक, पंढरीनाथ भोईर, गजेंद्र गुळवी, भूषण नाईक, रुपेश नाईक, मेघराज पाटील, केवल तरे, गोरक्षनाथ नाईक, राज पाटील, प्रकाश पाटील, अध्यक्ष, न्यू प्रगती मित्रमंडळ इत्यादी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *