Menu Close

मुंबई येथे श्री. सुनील घनवट यांनी घेतलेल्या भेटींना हिंदुत्वनिष्ठांचा सकारात्मक प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट

मुंबई : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदूसंघटन व्हावे, यासाठी मुंबईतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, धर्माभिमानी यांची भेट घेतली. याला हिंदुत्वनिष्ठांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.

१. पालघर, वसई येथे काही धर्माभिमान्यांनी वसईत होत असलेल्या धर्मांतराची गंभीर समस्या या वेळी निदर्शनास आणली. तसेच धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. डहाणू येथील सद्गुरु गजानन महाराज मंदिराच्या विश्‍वस्तांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याविषयी अनुकूलता दर्शवली. तसेच त्यांनी मंदिरातील भक्तांसाठी मराठी साप्ताहिक सनातन प्रभात चालू केले.

२. शिवसेनेचे उपशाखाप्रमुख महेश पडवळ यांनी त्यांच्या कार्यक्रमात राष्ट्र-धर्मपर माहिती देणारे फलक प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्याची अनुमती दिली.

३. जोगेश्‍वरी येथील बैठकीत धर्मप्रेमी श्री. विनोद त्रिपाठी, सौ. विजया तसेच सर्वश्री संतोष पाताडे, प्रभात सिंग, सूरज ठाकूर हे उपस्थित होते. या वेळी ‘गुरुकुल शिक्षणप्रणाली नुसार मुलांना शिक्षण मिळाला हवे’ यावर चर्चा झाली. यादृष्टीने समिती करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. या वेळी श्री. सुनील घनवट यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने करायचे प्रयत्न’ या संदर्भात मार्गदर्शन केले. धर्मप्रेमी सर्वश्री संतोष पाताडे, प्रभात सिंग, सूरज ठाकूर यांनी प्रत्येक सप्ताहाला एकत्र येण्याचे आणि धर्मसेवेत सक्रिय होण्याचे ठरवले.

४. सांताक्रूझ येथील धर्मप्रेमी श्री. लतेंद्र सावंत यांनी ‘माहितीचा अधिकार कार्यशाळा’ आयोजित करण्याची सिद्धता दर्शवली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *