नवी देहली : संगीत आणि विद्येची अधिष्ठात्री मानली जाणारी श्री सरस्वती देवी जपानमध्ये जलदेवतेच्या रूपात पुजली जाते. तसेच अन्य हिंदूंच्या देवतांची पूजा जपानमध्ये कोणत्या स्वरूपात होते यावषयी एक लघुपट बनवण्यात आला आहे.
इंडियन डेइटीज वरशिप्ड इन जपान नामक हा लघुपट प्रसिद्ध इतिहासतज्ञ आणि छायाचित्रकार बिनॉय के. बहल यांनी बनवला असून जपानमधील ५० मंदिरांचे चित्रण या लघुपटात समाविष्ट करण्यात आले आहे. हे जपानमधील लोक धर्म आणि अध्यात्म याला वज्रायनच्या शास्त्रीय सिद्धांताशी जोडतात. त्याचे मूळ थेट बिहारमधील नालंदाशी जोडता येते, असे बहल यांनी म्हटले आहे. बहल यांनी हा लघुपट भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागासाठी सिद्ध केला असून जपान फाऊंडेशन आणि जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना सहकार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात