Menu Close

संभाजीनगरमध्ये धर्मांधांकडून अंडी फेकून श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना

एम्आयएम्चे इम्तियाज जलील विजयी झाल्यापासून धर्मांधांचा उन्माद चालूच !

मंदिरांची विटंबना करणार्‍या धर्मांधांनी उद्या तेथील हिंदूंवर अत्याचार केल्यास हिंदूंना कोण वाचवणार ? हिंदूंनो, स्वतःसह मंदिरांच्याही रक्षणासाठी वेळीच संघटित व्हा !

संभाजीनगर : एम्आयएम्चे इम्तियाज जलील खासदारपदी निवडून आल्यावर धर्मांधांनी २४ मे या दिवशी पहाटे ३ वाजता अंडी फेकून सिडको आविष्कार वसाहतीतील श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना केली. हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी संयमाची भूमिका घेतल्यामुळे अनर्थ टळला. (प्रत्येक वेळी हिंदूच संयम बाळगतात, यावरूनच सहिष्णु कोण, ते लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याप्रकरणी पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज कह्यात घेऊन अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.

पहाटे ४ वाजता पुजारी मंदिरात आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. हिंदुत्वनिष्ठांनीही घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी मंदिराची स्वच्छता केली. या वेळी पोलिसांनी धर्मांधांना लवकरात लवकर अटक करणार असल्याचे सांगितले. (हिंदूंनो, धर्मांधांना अटक होईपर्यंत पोलिसांचा संघटितपणे पाठपुरावा घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *