Menu Close

माझा आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍या काँग्रेसला शिक्षा मिळाली : स्वामी असीमानंद

जनतेने काँग्रेसला धडा शिकवला असला, तरी भाजपने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवले पाहिजे, असे अनेक हिंदूंना वाटते !

द्वारका (गुजरात) : तत्कालीन काँग्रेस सरकारने सोनिया गांधी यांच्या आदेशावरून त्यांच्या मुसलमान आणि ख्रिस्ती मतदारांना खुश करण्यासाठी हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा केला. माझा आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ केला. यामुळे आता झालेला काँग्रेसचा पराभव ही तिला मिळालेली शिक्षाच आहे, असे प्रतिपादन समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्त झालेले स्वामी असीमानंद यांनी केले आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

स्वामी असीमानंद पुढे म्हणाले की, ख्रिस्ती मिशनरी नियोजनबद्धरित्या देशात धर्मांतराचे कार्य करत आहेत. आम्ही आदिवासी भागामध्ये मिशनरींकडून होणारे धर्मांतर रोखण्याचा प्रयत्न चालू केला. जवळपास ४० सहस्र हिंदूंची ‘घरवापसी’ केली.  त्यामुळे काँग्रेस घाबरली. यासाठीच काँग्रेसने आम्हाला लक्ष्य करून षड्यंत्र रचले. यातून हिंदूंना जगभरात अपकीर्त करण्यासाठी आणि इस्लामी आतंकवादापासून लक्ष हटवण्यासाठी हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. आता काँग्रेसच्या कुकृत्याला जनतेने शिक्षा दिली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *