Menu Close

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत वणी, चंद्रपूर, गडचिरोली आणि मूल येथे विविध उपक्रम

साकडे घालतांना साधक

चंद्रपूर : येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि मूल येथे ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील १० मंदिरांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, यासाठी साकडे घालण्यात आले. तसेच ६ मंदिरांची स्वछता करण्यात आली, तर ४ ठिकाणी साधनेविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनांस ५५ जिज्ञासूंची उपस्थिती होती.

क्षणचित्रे

  • साधनेविषयीची माहिती आवडल्याचे प्रवचनांना उपस्थित असणार्‍या जिज्ञासूंनी सांगितले.
  • तुकूम (चंद्रपूर) येथील मंदिरात साकडे घालत असतांना तिथे खेळणारी मुले स्वत:हून साकडे घालण्यात सहभागी झाली.

वणी (यवतमाळ) येथे विविध उपक्रम

मंदिराची स्वच्छता करतांना साधिकांसमवेत भाविक

वणी : परात्पर गुरु डॉ. आठवलेे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २२ मे या दिवशी येथील अमृतभवन येथील जागृत हनुमंत देवस्थानाची स्वच्छता करण्यात आली. यासह येथे परात्पर गुरु डॉ. आठवलेे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत यांसाठी साकडे घालण्यात आले. या वेळी या मंदिरातील चैतन्य वाढल्याचे जाणवले. तसेच मंदिरातील पुजारी आणि साधक यांची भावजागृती झाली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *