अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशना’चा दुसरा दिवस (२८ मे)
अधिवक्ता हरि शंकर जैन आणि निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर यांचा वाढदिवस साजरा !
एकाच क्षेत्रात कार्य करणार्या अधिवक्त्यांच्या अधिवेशनात यंदा कुटुंबभावना अनुभवायला मिळाली. सर्वच अधिवक्ते एका ध्येयाने प्रेरित होऊन मनानेही एक झाल्याचे अनुभवायला मिळाले. अधिवक्त्यांमध्ये यंदा औपचारिकता न रहाता मोकळेपणा आला होता. अशातच २८ मे या दिवशी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले देहली येथील सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता हरिशंकर जैन आणि संभाजीनगर येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुधाकर चपळगावकर यांचा वाढदिवसही होता. वाढदिवसाच्या निमित्ताने अधिवक्ता हरिशंकर जैन अन् माजी न्यायाधीश सुधाकर चपळगावकर यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अधिवक्ता हरिशंकर जैन यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य तथा निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. सुधाकर चपळगावकर यांचा ७५ वा वाढदिवस सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन, तसेच अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांच्या हस्ते शाल अर्पण करून साजरा करण्यात आला.
सत्काराच्या वेळी निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी एकमेकांना भावपूर्ण आलिंगन दिले. दोन भिन्न प्रांतामधील अधिवक्त्यांमध्ये असलेले प्रेमाचे नाते या वेळी अनुभवायला मिळाले.