Menu Close

उज्जैन सिंहस्थपर्वात साखळी बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र उघड !

बॉम्बस्फोटाचा कट रचणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांना अटक करून तात्काळ खटला चालवून त्यांच्यावर कठोर शासन करण्याचे
धाडस राज्यकर्ते दाखवतील का ?
हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात काँग्रेस, साम्यवादी, आम आदमी पक्षाचे नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

kumbh

उज्जैन : येथे पुढच्या महिन्यात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. येथील मुलांच्या वसतीगृहात नुकतेच सापडलेल्या स्फोटकांच्या चौकशीतून या षड्यंत्राचा सुगावा लागला आहे.

१. या संदर्भात आतंकवाद्यांच्या अटकेसाठी मध्यप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील अनेक ठिकाणी छापे मारले.

२. गेल्या दोन दिवसांत ४५ ठिकाणी छापे मारून १५० हून लोकांची चौकशी करण्यात आली.

३. सूत्रांच्या माहितीनुसार हे षड्यंत्र तडीस नेण्यासाठी ३० ते ४० वयोगटातील आतंकवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

४. सूत्रांच्या माहितीनुसार तीन संशयित आतंकवाद्यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख संजीव शमी यांनीही दावा केला आहे की, तीन आतंकवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

५. उज्जैनच्या जवळील महिदपूर, रतलाम, झिरन्या, शाजापूर आदी ठिकाणी सिमी ही बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या जिहादी कार्यकर्त्यांकडून घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षींनी आपत्काळाविषयी सतर्क करणे

१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे अन् याच कालावधीत उज्जैनमध्ये महाकालेश्‍वराचे स्थान असलेल्या ठिकाणी महाकुंभ होत आहे. (उज्जैन येथे २२ एप्रिलपासून सिंहस्थपर्व आरंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तेथे स्फोटके सापडणे, बॉम्बस्फोटाचे षड्यंत्र उघड होणे, यांवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती सत्य आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *