देशातील वाढत्या दंगली शासनाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करतात !
- पोलीस अधिकारी घायाळ
- पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर
- ८ जणांना अटक
- होळीच्या दिवशी बाजारपेठ बंद
नंदुरबार : येथे २२ मार्चनंतर सलग दुसर्या दिवशी म्हणजे २३ मार्चलाही हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये दंगल झाली. या वेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत उपअधीक्षक (गृह) शिवाजीराव गावीत आणि त्यांचा अंगरक्षक दोघेही गंभीर घायाळ झाले. २३ मार्चला पोलिसांनी जमावावर अश्रूधुराचा वापर केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. याचा परिणाम होळीच्या सणावर होऊन व्यापार्यांनी त्वरित बाजारपेठ बंद केली. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हिंदु आणि मुसलमान या दोघांच्या प्रत्येकी २५० जणांवर सार्वजनिक मालमेत्तेची लूट आणि हानी करणे, पोलिसांवर जीवघेणे आक्रमण करणे या आरोपाखाली गुन्हे नोंदवण्यात आले.
१. शहरातील माळीवाडा भागामध्ये एका किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये २२ मार्च या दिवशी वादावादी झाली होती. त्याचे पर्यावसान मोठ्या दंगलीत होऊन यात पोलीस निरीक्षक ए.बी. कटके आणि ५ पोलीस कर्मचार्यांसह १० हून अधिक लोक घायाळ झाले होते. तथापि दुपारी ४ वाजेपर्यंत स्थिती नियंत्रणात आली होती.
२. असे असतांना दुसर्या दिवशी २३ मार्चला सकाळी ९ वाजता अँग्लो उर्दू हायस्कूल परिसरात आणि माळीवाडा परिसरात पुन्हा लाठ्या अन् तलवारी घेतलेला जमाव चालून आला. त्यांनी अनेक घरांमध्ये घुसून साहित्य फेकून दिले. प्रत्येक घरातील दूरचित्रवाणीसंच, शीतकपाट (फ्रिज) आदी वस्तू रस्त्यावर आणून फोडल्या.
३. त्यामुळे पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर दगड आणि विटा यांचा वर्षाव केला.
४. या वेळी घटनास्थळी आलेले उपअधीक्षक (गृह) शिवाजी गावीत जमाव नियंत्रित करत असतांना ते तसेच त्यांचा अंगरक्षक सलिम दोघेही घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
नंदुरबार येथे धर्मांधांकडून किरकोळ कारणावरून दंगल, १० हून अधिक घायाळ
- धर्मांधांकडून हैदोस
- रस्त्यावर दगड, विटा आणि बाटल्या यांचा खच
वाढत्या दंगलींमुळे शासनाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होतो ! किरकोळ कारणावरून दंगल घडवणार्या धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नंदुरबार : शहरातील माळीवाडा भागामध्ये एका किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये २२ मार्च या दिवशी वादावादी झाली. त्याचे पर्यावसान मोठ्या दंगलीत झाले. यामध्ये १० हून अधिक घायाळ झाले असून रस्त्यावर दगड, विटा आणि बाटल्या यांचा खच पडला होता. पोलिसांच्या दंगल प्रतिबंधक दलाने परिस्थिती आटोक्यात आणली असून येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१. माळीवाडा भागामध्ये एका शाळेत १० वीची परीक्षा चालू होती. हा पेपर चालू असतांना परीक्षेला बसलेल्या हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये नक्कल (कॉपी) करण्यावरून वादावादी झाली.
२. परीक्षा संपल्यानंतर दुपारी २ ते २.३० या वेळेत मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुसलमान यांचा जमाव गोळा झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चिराग गल्ली आणि माळीवाडा या दोन्ही परिसरांत एकमेकांवर प्रचंड प्रमाणात दगड, विटा आणि बाटल्या फेकण्यात आल्या. या दंगलीमध्ये १० जण घायाळ झाले आहेत. (यावरूनच धर्मांधांची पूर्वसिद्धता आणि त्यांचे दंगल घडवून आणण्याचे पूर्वनियोजन दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. या दंगलीमध्ये एका दुकानाचा काही भाग जाळण्यात आला असून अनेक दुकानांतील साहित्यांची लुटमार करण्यात आली आहे.
४. दंगलीतील घायाळांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी प्रविष्ट करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात