Menu Close

बौद्धांच्या आंदोलनानंतर श्रीलंकेतील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांचे त्यागपत्र

  • श्रीलंकेत जिहादी आतंकवाद्यांच्या एका आक्रमणानंतर मुसलमानांवर आक्रमणे होतात, त्यांच्या मशिदी बंद कराव्या लागतात, बुरख्यावर बंदी घातली जाते, शरणार्थी मुसलमानांना देश सोडून जाण्यास सांगितले जाते आणि आता मुसलमान मंत्र्यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले जाते; मात्र भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया होत असतांना, तसेच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाल्यावरही असे कधी घडले आहे का ? तरीही हिंदूंना असहिष्णु ठरवले जाते !
  • श्रीलंकेत बौद्धांच्या आंदोलनानंतर मंत्र्यांना त्यागपत्र द्यावे लागते, तर भारतात देशाच्या तत्कालीन मुसलमान गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या मुलीचे अपहरण झाल्यावर जिहादी आतंकवाद्यांना सोडावे लागले होते, हे लक्षात घ्या !

कोलंबो (श्रीलंका) : श्रीलंका सरकारमधील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. बौद्ध भिक्षू अतुरालिए रनता थिरो यांनी ४ दिवसांपूर्वी सहस्रो बौद्धांसह कँडी शहरातील तीर्थक्षेत्रामध्ये उपोषण चालू केले होते. त्यानंतर देशात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. त्यांनी ३ मुसलमान मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. ‘या मंत्र्यांचे येथील ‘नॅशनल तौहीद जमात’ या आतंकवादी संघटनेशी संबंध आहेत’, असा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर मंत्र्यांनी त्यागपत्रे दिल्याचे सांगितले जात आहे. (श्रीलंकेत बौद्ध भिक्षू रस्त्यावर उतरून आतंकवाद्यांशी साटेलोटे असलेल्या मुसलमान मंत्र्यांच्या विरोधात आवाज उठवतात, तर भारतात हिंदूंचे काही कथित धर्माचार्य मंदिरांमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करणे, मुसलमानांची पाठराखण करणे यांसारखे कार्यक्रम राबवून गांधीगिरीचे प्रदर्शन करतात. त्यांनी बौद्ध भिक्षूंकडून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या संघटनेने इस्लामिक स्टेटच्या साहाय्याने इस्टरच्या दिवशी कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट केेले होते. थिरो हे सत्ताधारी पक्षाचे खासदारही आहेत. दुसरीकडे ‘जिहादी आतंकवादी गटाने केलेल्या आक्रमणानंतर काही मुसलमानांवरील आरोपांचे अन्वेषण करण्यास सरकारला मोकळीक मिळावी, यासाठी हे पाऊल उचलले आहे’, असे म्हटले आहे. (मुसलमानांचा साळसुदपणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

श्रीलंकेतील ‘मुस्लिम काँग्रेस’चे खासदार रौफ हकीम म्हणाले की, जोपर्यंत सरकार मुसलमानांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलत नाही आणि अन्वेषण यंत्रणा अन्वेषण पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही संसदेत शेवटच्या रांगेत बसू.

श्रीलंकेमध्ये ९ टक्के मुसलमान असले, तरी २२५ सदस्यांच्या श्रीलंकेच्या संसदेत १९ मुसलमान खासदार आहेत. त्यांपैकी ९ जण मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री या पदांवर होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *