धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील होणार्या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी या धर्मप्रेमींचा आदर्श घ्यावा !
नाशिक : येथील गंगापूर परिसरातील धर्मप्रेमी युवकांनी स्थानिक मंदिर परिसरातील देवतांची जुनी चित्रे विसर्जित केली. येथील गोवर्धनेश्वर महादेव मंदिरासमोरील पारावर नागरिकांनी देवतांची जुनी चित्रे ठेवली होती. ती अयोग्य जागी ठेवल्याने देवतांच्या चित्रांची विटंबना होत होती. सर्वश्री दर्शन गिते, कुणाल वडणेरे, कुणाल सोनवणे, अतुल वायचळे, सागर आहेर या धर्मप्रेमींनी, तसेच बाल धर्मप्रेमी कु. उदय शिरसाठ आणि कु. सोहम माडीवाले यांनी यात सहभाग घेतले. हे सर्वजण हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत आयोजित केल्या जाणार्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होतात.