शबरीमला येथील अयप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणी महिलांनी नाही, तर राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना याचिका प्रविष्ट केली. साम्यवादी महिलांनी ‘स्टंट’ म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आध्यात्मिक भूमीला युद्धभूमीचे स्वरूप आले.
न्यायालयाने जरी ‘अयप्पा स्वामींच्या मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येईल’, असा आदेश दिला असला, तरी धर्मशास्त्र हे न्यायालयाच्याही आधी आहे, हे लक्षात घ्यावे. देवतांची कधीही टिंगलटवाळी करू नये. जे धर्मविरोधी काम करतात, त्यांना ईश्वरच धडा शिकवतो. एखाद्या व्यक्तीकडे कितीही पैसा आणि शक्ती असली, तरी तिला ईश्वराच्या समोर झुकावेच लागते; ईश्वरच सर्वश्रेष्ठ आहे.
न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्ताने धर्मरक्षणासाठी सहस्रो हिंदू रस्त्यावर उतरले. या निमित्ताने हिंदूसंघटन तरी झाले. आम्ही धर्मरक्षणाचा संकल्प करून कार्यरत आहोत. सरकारने तिहेरी तलाकच्या संदर्भात अध्यादेश आणला; पण कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा असलेल्या शबरीमला येथील मंदिराच्या परंपरांचे रक्षण करण्यासाठी मात्र अध्यादेश काढला नाही.
धर्मकार्य करणार्यांना दिशा देण्याचे कार्य गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) करत आहेत ! – श्री. टी.एन्.मुरारी
आज धर्मकार्याच्या तळमळीपोटी शेकडो युवक रस्त्यावर उतरले आहेत; पण त्यांना कुठे जायचे ते कळत नाही. त्यांना दिशा देण्याचे कार्य गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) करत आहेत.