Menu Close

बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले केंद्रशासन साध्वी प्रज्ञासिंह यांची सुटका करत नाही : स्वामी नारायण गिरी महाराज

भोपाळ : तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाने भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी असंवैधानिक पद्धतीने निर्दोष साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांच्या सहकार्यांना कारागृहात टाकले आहे. मुसलमान दुखावले जाऊ नयेत यासाठी बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले मोदी शासन त्यांची सुटका करत नाही, असा आरोप जुना अखाड्याचे आंतरराष्ट्रीय मंत्री स्वामी नारायण गिरी महाराज यांनी एका पत्रकार परिषदेत केला. या वेळी अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय आयोजक आणि हिंदू संसदेचे प्रणेते यति बाबा नरसिंहानंद सरस्वती महाराज आणि हिंदू स्वाभिमानचे राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष बाबा परमेन्द्र आर्य उपस्थित होते.

स्वामी नारायण गिरी महाराज पुढे म्हणाले की, भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थ महाराजांनी अर्धकुंभ मेळ्यात आयोजित केलेल्या धर्म संसदेत साध्वी प्रज्ञा यांच्या सुटकेविषयी जागृती केली होती. त्याप्रमाणे या वेळच्या कुंभ पर्वातही साध्वी प्रज्ञा आणि निर्दोष हिंदू कार्यकर्ते यांची सुटका हे प्रमुख सूत्र असेल. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण देशातील अधिकारी संत आणि १०० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. यति बाबा नरसिंहानंद सरस्वती महाराज म्हणाले की, श्रीरामजन्म भूमी, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्‍वनाथ आमची अस्मिता आणि धार्मिक भावना यांचे प्रतीक आहे; परंतु त्यापेक्षाही मोठे सूत्र म्हणजे इस्लामी जिहादपासून हिंदूचे रक्षण करणे, हे आहे. या वेळी कुंभपर्वात हिंदू अल्पसंख्यांक होणार नाहीत, यासाठी गहन चिंतन केले जाईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *