विदेशी पैशातून बांधकाम आणि जिहादी संघटनेकडून वापर
भारतात असे कधीतरी होईल का ? उत्तरप्रदेशमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या पैशातून मोठी मशीद बांधण्यात आली आहे. त्याच्या इमामाला काही मासांपूर्वीच अटक करण्यात आली. याविषयी देशातील मुसलमानांच्या संघटनांनी राष्ट्रप्रेमी भूमिका घेतल्याचे आढळून आले नाही !
कोलंबो : येथे ईस्टरच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांचा तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यातूनच त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. सरकारनेही देशात बुरख्यावर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता मुसलमानांनीच मदतुंगामा येथे जिहादी संघटना नॅशनल तौहीद जमातची मशीद असल्याच्या संशयावरून ती पाडून टाकली.
१. मशिदीचे प्रमुख अकबर खान यांनी सांगितले की, विदेशातून आलेल्या पैशातून ही मशीद बांधण्यात आल्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. या मशिदीचा वापर नॅशनल तौहीद जमातच्या जिहाद्यांकडून केला जात होता, असेही म्हटले जात होते. तसेच पोलीसही सातत्याने येथे चौकशीसाठी येत होते. या सर्व प्रकरणामुळे अन्य धर्मियांचा आमच्याविषयी अविश्वास वाढत होता. देशातील स्थितीकडे पहाता मशीद समितीने निर्णय घेतला की, गावात अन्य एक मशीद असतांना या मशिदीची आवश्यकता नाही. त्यामुळे ही मशीद पाडण्यात आली.
२. दुसरीकडे श्रीलंकेतील धार्मिक सूत्रांविषयी अधिकार असणारी संस्था ‘सिलोन जमायतुल उलेमा’ यांनी म्हटले आहे की, सर्व मशिदी अल्लाच्या आहेत. त्याचे व्यवस्थापन कोण करत आहे, यापेक्षा तिला नष्ट करणे इस्लामच्या विरोधात आहे. (मशिदींचे व्यवस्थापन आणि वापर जर जिहाद्यांकडून केला जात असेल, तर त्याविरोधात काय करायचे हे या संघटनेने सांगितले पाहिजे ! राष्ट्रघातकी कृत्य होत असतांना त्याविषयी काहीच न बोलता वास्तू पाडली म्हणून बोलणार्या संघटना त्यांची मानसिकता दर्शवतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात