होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठीची हिंदु जनजागृती समितीची चळवळ
मुंबई : होळी आणि रंगपचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी वांद्रे येथे मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने आणि मीरा रोड, तसेच मालाड येथील स्थानिक पोलीस स्थानकांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली.
मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी श्री. महेंद्र तांडेल, सागर लाड, समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधकही उपस्थित होते. मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने यांनी निवेदन स्वीकारल्यावर सांगितले, होळी आणि रंगपचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत, असे आम्ही पोलिसांना पत्रकांद्वारे सूचित करत आहोत.
मीरा रोड येथे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदीश शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. मोहन परब आणि सौ. ज्योती जोशी, तसेच समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधकही उपस्थित होते. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदीश शिंदे म्हणाले, समितीचे उपक्रम समाजोपयोगी असतात. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भातील मोहीम उल्लेखनीय होती. होळी-रंगपंचमीच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यास आम्ही सहकार्य करू.
याप्रमाणे मालाड पोलीस ठाण्यातही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुधीर महाडिक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. भूषण पाठक, समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते.
यवतमाळ येथेही जिल्हाधिकार्यांना निवेदन
यवतमाळ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी श्री. सचिंद्रप्रताप सिंह यांना होळीतील अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सनातन संस्थेचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक येथे पोलीस उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
नाशिक : येथे हिंदुत्ववाद्यांकडून पोलीस उपायुक्त श्री. विजय पाटील यांना, तर उपजिल्हाधिकारी श्री. खेडेकर जिल्हा प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. राहुल पाटील, सौ. रितुल पाटील, सौ. सुनीता गिते, श्री. प्रफुल्ल पाठक, श्री. मयुर दुसाणे यांचा सहभाग होता.
अकोला येथे पोलीस प्रशासनाला निवेदन
अकोला : येथे पोलीस प्रशासनाला धर्माभिमान्यांनी निवेदन दिले. या वेळी धर्माभिमानी नमिता कोपेकर, संगीता दुधगम, शुभम कोपेकर, हिंमतराव ताले, अजय खोत, नरेश कोपेकर, अपर्णा देशमुख आणि अधिवक्त्या श्रुती भट उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात