जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! भारतात इस्लामिक स्टेटचा धोका ओळखून सरकारने त्याची पाळेमुळे खणून काढावीत, हीच अपेक्षा !
चेन्नई : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १२ जून या दिवशी इस्लामिक स्टेट (आयएस्) या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्यावरून तमिळनाडूत ८ ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या आतंकवाद्याचा फेसबूकवर मित्र असणार्या महंमद अझरुद्दीन याच्या घरीही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तो केरळ आणि तमिळनाडू येथे मुसलमान तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्याचे काम करत होता. दक्षिण भारतात घातपात करण्याचा त्याचा कट होता, असे सांगितले जात आहे.
१. ‘श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचा भारताशी काही संबंध आहे का ?’, याची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथक श्रीलंकेत गेले होते. तेथून माहिती घेतल्यानंतर या पथकाने या धाडी टाकल्या आहेत.
२. तमिळनाडूतील कोईम्बतूर आणि अन्य ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.
पोथनूर येथे अझरुद्दीन उक्कादम, सद्दाम, अकबर; कुणियामथुर येथे अबूबकर सिद्दीक आणि अल अमीन कॉलनीमध्ये वास्तव्य करणारा इधियाथुल्ला यांच्या घरीही धाडी टाकण्यात आल्या.
३. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार हाशमी हा दक्षिण भारतातील काही लोकांशी गेल्या ३ वर्षांपासून संपर्कात होता. तो येथे इस्लामिक स्टेटचे तळ उभारण्यासाठीही साहाय्य करत होता. हाशमी हा सामाजिक माध्यमांद्वारे केरळ आणि तमिळनाडू येथील इस्लामिक स्टेटमध्ये भरती होऊ इच्छिणार्यांच्या संपर्कात होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात