१. पत्रके छापून त्यांचे वितरण करणारे धर्माभिमानी
अ. केरळ मधील कोझीकोड जिल्ह्यातील धर्माभिमानी श्री. निखिल यांनी व्हॅलेंटाइन डेविषयी प्रबोधन करण्यासाठी ७५० पत्रके छापून घेतली आणि वितरीत केली. याला लोकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला.
आ. पालक्काड जिल्ह्यातील श्री. काशी विश्वनाथ यांनी शिव आणि शिवरात्रीचे महत्त्व असलेली २ सहस्र पत्रके छापून त्यांचे वितरण करणार असल्याचे सांगितले.
श्री. सुरेश हे एक धर्माभिमानी आहेत. तेसुुद्धा स्वतः पत्रके छापून वितरित करणार आहेत.
२. धर्माभिमान्यांनी सनातनच्या ग्रंथ विकत घेऊन त्यांचे वितरण करणे
अ. सेवा भारती या संघटनेचे अध्यक्ष श्री. सुंदरेशन हे मुलांसाठी भरतनाट्यम्चा वर्ग घेतात. त्यांनी त्यांच्याकडे येणार्या मुलांसाठी ३०० मल्याळम् लघुग्रंथ आणि ५० मल्याळम् मोठे ग्रंथ खरेदी करून ते वितरित केले.
आ. धर्माभिमानी श्री. रंजीत नायर यांनी शिवरात्रीच्या निमित्ताने जिज्ञासूंना वितरित करण्यासाठी ३० शिव लघुग्रंथ घेतले.
इ. धर्माभिमानी श्री. विठ्ठल बागडी यांचे दुकान आहे. त्यांनी धर्माविषयीची माहिती लोकांपर्यंत पोचावी; म्हणून १ सहस्र रुपयांचे मल्याळम् भाषेतील लघुग्रंथ विकत घेतले.
३. मुलांसाठी तणावमुक्ती वर्गाचे आयोजन करणारे कोट्टायाम जिल्ह्यातील कुडमाळूर येथील श्री. गोपकुमार !
कोट्टायाम जिल्ह्यातील कुडमाळूर येथील श्री. गोपकुमार यांनी त्यांच्या रहिवासी संकुलाच्या वतीने १० वी आणि १२ वीच्या मुलांसाठी तणावमुक्ती वर्गाचे आयोजन केले आणि समितीच्या कार्यकर्त्यांना वर्ग घेण्यास आमंत्रित केले. मुलांना याचा लाभ व्हावा, यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात