- आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर ख्रिस्ती म्हणून ओळखले जाणारे वाय. सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी हे आता मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले आहेत. तेही वडिलांप्रमाणे कट्टर ख्रिस्ती आहेत. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात ख्रिस्ती मिशनर्यांच्या हिंदुद्वेषी कारवाया वाढल्यास आश्चर्य ते काय ?
- एरव्ही चर्चवर चुकूनही कोणी दगड भिरकावल्यावर आकांडतांडव करत देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करणारे पुरो(अधो)गामी सरकारी भूमीवर ऐवधरित्या चर्च बांधण्याच्या विरोधात का बोलत नाहीत ?
- आंध्रप्रदेशमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन केले, तरच धर्मांध ख्रिस्त्यांच्या हिंदुविरोधी कारवायांना आळा बसेल !
कर्नूर (आंध्रप्रदेश) : कर्नूर जिल्ह्यातील श्री लक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराच्या जवळ ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून अवैधरित्या चर्चची उभारणी करण्यात येत आहे. हिंदूंचे पौराणिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण टेकड्यांनी वेढले आहे. ही संपूर्ण भूमी राज्याच्या धर्मादाय खात्याच्या अखत्यारीत येते. या मंदिराच्या जवळच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करण्याचे प्रयत्न ख्रिस्ती मिशनर्यांनी पूर्वीपासून चालवले होते. सुमारे ४ वर्षांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्यांनी या ठिकाणी एका ‘क्रॉस’ची उभारणी केली होती. त्या वेळी आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलगु देसम् पक्षाचे सरकार सत्तेवर होते. त्या वेळच्या प्रशासनाने या अवैध बांधकामाला कुठलाच विरोध केला नाही. सध्या आंध्रप्रदेशमध्ये वायएस्आर् काँग्रेसचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.
१. आंध्रप्रदेशमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच मिशनर्यांनी अवैध ‘क्रॉस’च्या जवळ भव्य चर्च उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
२. या अवैध बांधकामाविषयी ‘स्थानिक नागरिक मंच’ने वनसुरक्षा विभागाकडे तक्रार केली. श्रीलक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराजवळ ख्रिस्ती मिशनर्यांनी अवैधरित्या बळकावलेली भूमी तातडीने मोकळी करण्यात यावी. तसेच या भूमीवर अतिक्रमण करू पहाणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (अवैध बांधकामाविषयी नागरिकांना तक्रार करावी लागते, हे संतापजनक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. यापूर्वी ख्रिस्ती मिशनर्यांनी तिरुपती येथील भगवान श्री वेंकटेश्वराच्या ७ टेकड्यांपैकी एका टेकडीवर चर्च उभारण्याची मागणी केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात