परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ !
वाराणसी (उत्तरप्रदेश) : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील वाराणसी, सैदपूर (गाझीपूर), सुलतानपूर आणि बिहारमधील मुझफ्फरपूर अन् सोनपूर येथे नुकतेच हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. वाराणसी येथील आशापूरच्या श्री चौरामाता मंदिरामध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे स्वास्थ्य उत्तम रहावे’, याकरिता प्रार्थना करण्यात आली. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी सामूहिकपणे नामजप केला. तसेच सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर आणि सौ. सानिका सिंह यांनी प्रभु श्रीराम अन् श्री हनुमान यांच्याविषयी विशेष माहिती उपस्थित भाविकांना सांगितली.
सैदपूर (गाझीपूर) येथील धर्मप्रेमी श्री. शिवकुमार यांनी येथील शिवमंदिरामध्ये ‘साधना’ विषयावर प्रवचनाचे आयोजन केले. तसेच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी त्यांनी धर्मप्रेमींसह सामूहिक प्रार्थना केली. सुलतानपूर येथे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे स्वास्थ्य उत्तम रहावे, याकरता हिंदु धर्मप्रेमींनी एकत्र येऊन येथील सावरिया शिवमंदिरामध्ये सामूहिक प्रार्थना केली. यासाठी धर्मप्रेमी आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. हौसला प्रताप यांनी साहाय्य केले. मुझफ्फरपूर (बिहार) येथील जवाहरलाल मार्गावरील शिवमंदिरामध्ये सामूहिक स्वच्छता करण्यात आली.