Menu Close

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची हत्या

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या राज्यात भाजप नेत्यांच्या होणार्‍या हत्यांविषयी समाजवादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आदी का बोलत नाहीत ? याचा विरोध का करत नाहीत ?

जबलपूर (मध्यप्रदेश) : स्वर्गदारी येथे ऋषभ जैन या २७ वर्षीय भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या करून त्यांचा मृतदेह पुरल्याची घटना समोर आली. त्यांचा मृतदेह पुरून त्याच्यावर ‘दी एण्ड’ असे लिहिण्यात आले होते. ऋषभ जैन यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्च्याच्या महामंत्रीपदाचे दायित्व होते. त्यांनी मद्य आणि अवैध रेती उत्खनन यांच्याविरोधात अभियान चालवले होते. यातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (मध्यप्रदेशमध्ये वाळू माफिया, मद्य माफिया यांची दहशत आहे आणि याआधीही त्यांना विरोध करणार्‍यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीत, हे संतापजनक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *