- मोठ्या प्रमाणात क्रॉस लावेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? हिंदूंनी ‘ॐ’ किंवा अन्य काही धार्मिक चिन्हे अवैधरित्या लावली असती, तर केरळमधील साम्यवादी सरकारने ती लावू दिली असती का ?
- हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळी क्रॉस लावण्याचे धाडस होतेच कसे ? या कायदाद्रोहाविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी काही बोलतील का ?
थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात असलेल्या पांचालीमेदू टेकड्यांवरील शबरीमला मंदिराला ‘पुंकवनम्’ या नावाने दान करण्यात आलेल्या पवित्र वनात ख्रिस्ती चर्चने जागा बळकावण्यासाठी अवैधरित्या ‘क्रॉस’ लावले आहेत. ते त्वरित काढून टाकण्याचा आदेश महसूल खात्याच्या अधिकार्याने दिला आहे. प्रतिश विश्वनाथ या हिंदुत्वनिष्ठाने सामाजिक प्रसारमाध्यमांवर एक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे. त्यात शबरीमला मंदिराच्या पवित्र जागेवर शेकडो क्रॉस लावण्यात आल्याचे दिसत आहे. चर्चच्या या अवैध कृत्याला केरळमधील साम्यवादी सरकारचा पाठिंबा असल्याने त्याविरुद्ध कुठलीच कारवाई झाली नसल्याचे श्री. विश्वनाथ यांनी दाखवून दिले.
१. पांचालीमेदू हे ठिकाण अनेक हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. तेथे पांचाली म्हणजेच द्रौपदी ही तिच्या पतींसमवेत म्हणजे पांडवांसमवेत १२ वर्षांच्या वनवास काळात काही काळ येथे वास्तव्याला होती, अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
२. या जागेवर त्रावणकोर देवस्थानाच्या अधिपत्याखालील भुवनेश्वरीदेवीचे प्राचीन मंदिरही अस्तित्वात आहे. या ठिकाणी मकरसंक्रांतीला अय्यप्पा देवतेचे भक्तगण एकत्र येतात. तेथून त्यांना शबरीमला मंदिरात प्रज्वलित केलेली पवित्र ज्वाला दिसू शकते.
३. या परिसरात अनेक ठिकाणी अवैध क्रॉस लावण्यात आले आहेत. तसेच तेथे अनेक फलक आणि स्वागतद्वार उभारून ते ‘ख्रिस्त्यांचे प्रार्थनास्थळ आहे’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे करून हिंदूंची ही जागा हडप करण्याचे कारस्थान रचले गेले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात