Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त बेंगळूरू (कर्नाटक) येथे ‘हिंदू एकता दिंडी’

दिंडीत रथावर ठेवण्यात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा

बेंगळूरू (कर्नाटक) : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त नुकतीच बेंगळूरू येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. विजयनगरमधील आदि चुंचनगिरी मठात धर्मध्वजाचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर संकष्टहर गणपति मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. या वेळी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूसंघटनाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या दिंडीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, मारुति औषधालयाचे मालक श्री. महेंद्र मल्होत्रा, गोरक्षक राघवेंद्र, मानवी हक्क संघटनेचे श्री. प्रदीप, विजय विवेक फाऊंडेशनच्या सौ. शकिला शेट्टी, रणरागिणी शाखेच्या सौ. भव्या गौडा आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हिंदू एकता दिंडीत सहभागी झालेले साधक आणि धर्माभिमानी

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्माचे प्रमुख नेते ! – श्री. सौम्यनाथ स्वामीजी, मठाधीश, आदि चुंचनगिरी महासंस्थान

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्माचे प्रमुख नेते आहेत. ते हिंदु धर्माचे  कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य करत आहेत ! – ब्रह्मर्षी डॉ. उमेश शर्मा गुरुजी, बेंगळूरू

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले या महायुगपुरुषाच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य होत आहे. ते विष्णूचे अवतार आहेत.

क्षणचित्रे

१. रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींनी राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा यांची वेशभूषा केली होती.

२. युवकांनी स्वरक्षण प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यामुळे वातावरणात क्षात्रतेज निर्माण झाले.

अनुभूती

१. दिंडीतील रथावर ठेवण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातल्यानंतर वातावरणातील चैतन्यात एकदम वाढ झाली. त्यामुळे उपस्थितांमध्ये भाव निर्माण होऊन उत्साह वाढला. त्याच वेळी १०० हून अधिक धर्माभिमानीही दिंडीत सहभागी झाले.

२. ‘दिंडीतील परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेतून सुदर्शनचक्र बाहेर पडत आहे’, अशी अनुभूती एका साधिकेला आली.

३. या दिंडीत सहभागी होण्याकरता काही कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यालयाकडून सुट्ट्या  मिळण्यात अडचण होती. त्या सर्वांना दिंडीच्या दिवशी सुट्ट्या मिळाल्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *