Menu Close

जळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शासकीय पथकावर धर्मांध फळविक्रेत्यांकडून दगडफेक !

धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय होय !

22-Jalgaon-Photo-3
अतिक्रमण हटवण्यासाठी आलेले पोलीस आणि त्यांना विरोध करणारे धर्मांध

जळगाव : जळगाव महापालिकेने येथील शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते; मात्र धर्मांध फळविक्रेत्यांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या. त्यांना अगोदर समज देण्यात आली. तरीही त्यांचा उद्दामपणा कायम होता. मनपाचे अतिक्रमण पथक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास गेले असता या अतिक्रमणधारकांनी उद्दामपणा करत दगडफेक केली. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हे लक्षात येते ! असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी पोलिसांनी ७ धर्मांधांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत.

जळगाव महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा ही मोहीम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. काही अतिक्रमणधारकांनी आणि हातगाडीवर खाद्य व्यवसाय करणार्‍यांनी स्वतःहून त्यांच्या गाड्या हटवल्या आणि महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर ते स्थायिक झाले. त्याचप्रमाणे शिवाजी रस्त्यावर फळविक्रेत्यांकडून होणारे अतिक्रमणही महापालिकेने हटवले होते. अतिक्रमण हटवल्याच्या प्रकरणी काही फळविक्रत्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. असे असतांनाही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून उद्दाम धर्मांध फळविक्रेत्यांंनी अतिक्रमण करत फळांच्या गाड्या पुन्हा शिवाजी रस्त्यावर उभ्या केल्या. (यावरून धर्मांध कायद्यालाही जुमानत नाहीत, हे लक्षात येते ! भाजप-शिवसेना युती शासनाने अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी त्यांना महापालिकेच्या वतीने समजवण्याचाही प्रयत्न करण्यात आला (अतिक्रमण करणार्‍यांना समजवणारे नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणारे प्रशासन हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात); मात्र तरीही धर्मांधांनी तेथून हटण्यास नकार दिला. महापालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधांनी त्यांच्या अंगावर फळे मारली. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत काही धर्मांधांना कह्यात घेतले.

या भागात धर्मांध फळविक्रेत्यांचा उद्दामपणा चालू असतो. रहदारीला कायम अडथळा ठरेल, अशापद्धतीने फळांच्या गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहनांसह पादचार्‍यांनाही त्रास होतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *