धुळे : येथील ७० ते ८० धर्मांधांनी १८ जून २०१९ च्या रात्री रात्री ९ च्या सुमारास गोरक्षक श्री. विकास गोमसाळे आणि श्री. मयूर विभांडीक या गोरक्षकांची रिक्शा अडवून त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. ‘गोमांस का धंदा चौपट हो रहा है, इनको खत्म कर दो’, असे म्हणत त्यांना पुष्कळ मारहाण केली. त्यात ते गंभीर घायाळ आहेत. त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील साखळी, खिशातील रोख रक्कम, भ्रमणभाष धर्मांधांच्या जमावाने बळजोरीने हिसकावून घेतले. गोरक्षक हे वडजाई रोड येथून ऑटोरिक्शाने जात असतांना अमजद मुल्लाच्या मुलाने गावठी पिस्तुल डोक्याला लावून रिक्शा थांबवली. या आक्रमणाच्या निषेधार्थ आणि आक्रमण करणार्यांच्या विरोधात तात्काळ अटक करून कारवाई करावी, या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध मोर्चा काढला.
१९ जून २०१९ ला सायंकाळी ४ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक, मनोहर टॉकीज येथून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून १ सहस्र २०० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. शेवटी पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे यांना मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.
क्षणचित्रे
- मोर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यावर एका धर्मांध युवकाने मध्यभागी उभे राहून सर्व हिंदूंची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. (धूर्त धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हे हिंदूंच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला हटकले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.
- या मोर्च्याला संरक्षण देण्यासाठी ८ हून अधिक पोलिसांच्या गाड्या आणि दीडशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता.
- मोर्चाच्या वेळी परिसरातील धर्मांधांची दुकाने बंद होती. (हिंदू संघटित झाल्यास त्यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही, हेच यातून लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या मागण्या
- धुळे शहरात सर्रासपणे गोहत्या केली जाते. एका पशूवधगृहामध्ये ४० हून अधिक गोवंश प्रतिदिन कापले जाते. त्यावर पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही. ज्या भागातील पोलीस ठाण्याच्या परिसरात अशा प्रकारे गोहत्या होत असेल, त्या भागातील संबंधित पोलीस अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांना दंड देण्यात यावा. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आम्ही अशा प्रकारची कारवाई पोलीस अधिकार्यावर केलेली आहे आणि यापुढेही करणार आहोत.
- जेथे हिंदूबहुल वस्ती आहे, त्या भागांमध्ये, तसेच हिंदूंच्या सणासुदीला धर्मांध जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात गोहत्या करतात. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. अशा धर्मांधांवर मोक्का कायद्याच्या अंतर्गत कारवाई करायला हवी.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
- श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. संजय शर्मा – धर्मांधांकडून हिंदूंना मारण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आतापर्यंत अनेक गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण झाले; मात्र आक्रमणकर्त्यांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.
- माजी नगरसेवक श्री. मनोज मोरे – हिंदुत्वनिष्ठांवर प्राणघातक आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कलमे लावण्यात यावीत.
- माजी नगरसेविका जयश्री अहिरराव – धर्मांध हिंदु मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु वस्तीमध्ये असलेल्या चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात आणि ज्या भागात दंगल झाली, त्या भागातील पोलीस ठाण्यांंमध्ये एकही पोलीस नसतो. जो पोलीस असतो तो रात्री पूर्ण नशेत असतो. पोलीस ठाण्यात असे पोलीस बसवून काय उपयोग ? (पोलीस ठाण्याची ही स्थिती असेल, तर जनतेचे रक्षण कसे होणार ? व्यसनी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यासह पोलीस ठाण्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणे अपेक्षित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदू सहिष्णू असल्याची पोलीस अधीक्षकांची स्पष्टोक्ती
या प्रसंगी पोलीस अधीक्षक म्हणाले, ‘‘हिंदूंच्या भावना आम्ही समजू शकतो. तुमच्या सर्वांचे अभिनंदन की, तुम्ही काल शांतता पाळली. कुठलाही अनर्थ केला नाही. आम्ही सर्व पोलीस आपल्या समवेत आहोत. एकही गाय कापली जाणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करू.’’ (पोलीस अधीक्षकांनी गोरक्षण करण्यासह गोरक्षकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवरही कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात