Menu Close

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी कायदा करा ! – शिवसेनेची लोकसभेत मागणी

नवी देहली : अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर उभारले गेलेच पाहिजे, अशी शिवसेनेची ठाम भूमिका असून मंदिर उभारण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

खासदार शेवाळे म्हणाले की,

१. वर्ष १५२८ मध्ये मोगलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याच ठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला; मात्र त्या ठिकाणी कधीही नमाजपठण करण्यात आले नाही.

२. २३ डिसेंबर १९४९ पासून त्या ठिकाणी प्रभु श्रीरामाचे भजन आणि कीर्तन करण्यास प्रारंभ झाला. नंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ती वास्तू वादग्रस्त ठरवून बंद केली. प्रत्यक्षात त्या ठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही गेल्या ७१ वर्षांत जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही.

३. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात अयोध्येत जाऊन रामललांचे दर्शन घेतले. त्या वेळी राममंदिर उभारण्यासाठी कायदा करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. जगभरातील हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर राखत राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी कायदा करावाच लागेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *