कोल्हापूर : कोल्हापूर येथील उत्तर मतदार संघातील शिवसेनेचे सलग दोन वेळा निवडून आलेले आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी आमदार श्री. क्षीरसागर यांना ‘साधना’ हा ग्रंथ भेट दिला. या वेळी समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा !
Tags : Hindu Janajagruti Samiti