पुणे : शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा हिंदु धर्म अन् राष्ट्रहित यांच्या कार्याला सक्रीय पाठिंबा असतो. शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे आणि श्री. रघुनाथ ढोबळे यांनी २० जून या दिवशी त्यांच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.