करियर करण्यापेक्षा महिलांनी कुटुंबाच्या भल्यासाठी त्याग करायला हवा. सध्या संस्कार, संस्कृती यांना मृत्यूघंटा लागली आहे. घरात सगळ्या सुखसोयी असूनही समाधान नाही.
घरातील स्त्री धर्मापासून दूर गेल्यामुळे हे प्रकार होत आहेत. आई ही सतत तेवणारी (जळणारी नव्हे) वात असते. ती स्वत: तेवून इतरांना उजेड देते. स्त्रीचे खरे स्वातंत्र्य हे धर्माचरणात घरच्यांच्या आनंदात असते.
भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे. यामुळे आईने मुलीला मर्यादेने वागणे शिकवले पाहिजे. माझ्या आईने माझ्यावर केलेल्या संस्कारांचा मला लाभ झाला आणि माझा संसार सुखाचा झाला. सध्या संस्कार लोप पावत चालल्यामुळे आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जात आहे.
महिला सुधारल्या, तर समाज सुधारेल. समाजाला घडवण्याचे मोठे दायित्व महिलांवर आहे. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू नये, तर पुरुषांच्या क्षमतेने काम करायला हवे. धर्मातल्या परंपरांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात