पुणे : पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने अलंकापुरी आणि देहू येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे २६ जूनला सायंकाळी पुण्यनगरीत आगमन झाले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही देहभान हरपून विठ्ठलनामामध्ये दंग झालेल्या वारकर्यांचा उत्साह पावसाच्या सरींमध्येही कायम होता. भवानी पेठेतील विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराज यांची पालखी निवासाला असेल. २७ जून या दिवशीही दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी असून २८ जूनला सकाळी त्या पुढे मार्गस्थ होतील. वारकर्यांच्या सोयीसाठी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणाही कार्यरत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात