मेरठ (उत्तरप्रदेश) : श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अशा सूचना आहेत ज्या सामान्यतः युद्धक्षेत्रात दिल्या जातात. भगवद्गीता केवळ धार्मिक ग्रंथ नाही. तरुणांनी ती वाचली पाहिजे; कारण आपल्याला जीवनातील सर्व घटनांना तोंड देण्यासाठी ती सिद्ध करील. युद्धक्षेत्रात आम्ही केवळ युद्धाविषयी बोलतो; म्हणून मी भगवद्गीतेला एक सैन्य-हस्तपुस्तिका म्हणतो, असे उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये सैन्य भरतीचे अतिरिक्त महासंचालक असणारे मेजर जनरल सुभाष शरण यांनी सांगितले. २५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उत्तरप्रदेशच्या बागपत येथे झालेल्या सैन्यभरतीच्या वेळी ते बोलत होते.
मेजर जनरल पुढे म्हणाले की, इराकमध्ये सैन्य तैनात करण्यापूर्वी अमेरिकेच्या सैन्याधिकार्यांनी त्यांच्या सैनिकांसाठी भारतातून भगवद्गीतेच्या ३० सहस्र प्रती घेतल्या होत्या. त्यांना त्यातील ‘कर्म योग’ म्हणजेच युद्ध लढण्यामागील कारणे आणि अंतिम परिणामांविषयी विचार न करता शत्रूविरोधी लढण्यास त्यांच्या सैनिकांना प्रवृत्त करायचे होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात