Menu Close

गुना (मध्यप्रदेश) : ‘लव्ह जिहाद’च्या आरोपीला पोलीस ठाण्यातून पळवून नेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न

पोलीस उपनिरीक्षकाला ठार मारण्याची धमकी

  • काँग्रेसच्या राज्यांत धर्मांधांचा उद्दामपणा ! एरव्ही हिंदूंना आतंकवादी आणि तालिबानी ठरवणारी काँग्रेस या धर्मांधांना काय म्हणणार आहे ? त्यांची कृती गांधीवादी होती, असे काँग्रेसला वाटते का ?
  • गोरक्षकांकडून गोतस्करांना किरकोळ मारहाण झाल्यावर आकांडतांडव करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ?

गुना (मध्यप्रदेश) : येथे इम्रान नावाच्या तरुणाने एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर धर्मांधांच्या जमावाने येथील केंट पोलीस ठाण्यात घुसून इम्रान याला सोडवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी धर्मांधांनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक कुशवाह यांना ठार मारण्याचीही धमकी दिली. धर्मांधांनी या वेळी पोलिसांवर त्यांना आणि समवेत आलेल्या महिलांना मारहाण केल्याचा आरोप केला. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाल्यावर ते फौजफाटा घेऊन पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी धर्मांधांना पळवून लावले. (केवळ पळवून न लावता त्यांना अटक करून कारागृहात डांबायला हवे होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *