मुंबई : हिंदूंचा सण होळीच्या काळात काही हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘वॉट्सअप’च्या माध्यमातून या सणाला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला.
हिंदुद्वेष्ट्यांनी एक अश्लील चित्र असलेला संदेश सिद्ध केला असून त्यांनी तो ‘वॉट्सअप’वरून इतरांना पाठवला होता. या चित्रामध्ये काही पाठमोर्या तरुणी ‘थ्री इडिएट्स’ या चित्रपटातील दृश्याप्रमाणे दाखवण्यात आल्या असून त्या चित्रावर ‘जहापनाह !’ ‘होली का तोहफा कबूल करो’ ‘अडव्हॉन्स में’ असे लिखाण करण्यात आले होते.
हे चित्र एवढे अश्लील आहे की, ते आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही. अशा हीन पातळीला जाऊन होळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. चित्रपटातील दृश्याचा समाजमनावर किती परिणाम होतो, हे यातून लक्षात येते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात