पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे आदेश
स्थानिक लोकप्रतिनिधींनी तक्रार करूनही पोलीस आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष
भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी आता कुठे आहेत ?
मेरठ (उत्तरप्रदेश) : येथे धर्मांधांकडून होणार्या अत्याचारांमुळे येथील मुसलमानबहुल प्रल्हादनगरच्या लिसाडी गेट भागातील ४२५ पैकी १२५ कुटुंबांनी पलायन केले आहे. हिंदूंनी विकलेली घरे बहुसंख्येने धर्मांधांनी विकत घेतली आहेत. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाच्या ‘नमो’ अॅपवर तक्रार करण्यात आल्यावर या कार्यालयाकडून राज्य सरकार आणि प्रशासन यांना चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर याची चौकशी चालू झाली आहे. अजूनही येथील हिंदूंच्या काही घरांवर ‘हे घर विकणे आहे’ असे फलक लावण्यात आल्याचे आढळून आले आहे.
१. प्रल्हादनगरमध्ये हिंदु महिलांची छेड काढणे, त्यांच्या सोनसाखळ्या चोरणे, विरोध केल्यावर मारहाण करणे आदी गोष्टी धर्मांधांकडून होत आहेत. त्यामुळे ‘येथे रहाणे असह्य होत असल्याने हिंदू तेथून पलायन करत आहेत’, असे स्थानिक हिंदूंनी सांगितले.
२. या संदर्भात काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक जितेंद्र पाहवा यांनी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देऊन धर्मांधांवर कारवाई करण्याची मागणी केली होती; मात्र ‘त्यावर कोणतीही कृती करण्यात आलेली नाही’, असे पाहवा यांनी सांगितले. (लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस आणि प्रशासन सामान्य हिंदूंच्या तक्रारींचे काय करत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. यानंतर भाजपचे स्थानिक नेते भवेश मेहता यांनी ११ जून या दिवशी संपूर्ण प्रकरणाची माहिती ‘नमो’ अॅपवर दिली. यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाला याविषयी कळवण्यात आले. त्यानंतर मेरठचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना याविषयी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. (या प्रकरणाची केवळ चौकशी नको, तर हिंदूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांवरही कारवाई हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि या प्रकरणी चौकशी चालू केली आहे.
४. याविषयी भाजपचे स्थानिक खासदार राजेंद्र अग्रवाल म्हणाले की, येथील स्थिती वाईट आहे. सध्या लोकसभेचे अधिवेशन चालू आहे. मेरठ येथे पोचल्यावर मी याकडे पाहीन आणि राज्य सरकारशी चर्चा करीन.
५. भाजपचे येथील आमदार डॉ. सोमेंद्र तोमर म्हणाले की, समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
‘लॅण्ड जिहाद’चे षड्यंत्र ! – शिवसेना
प्रल्हादनगर येथील हिंदूंचे पलायन हे ‘लॅण्ड जिहाद’चे षड्यंत्र आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने या विरोधात पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेशकुमार सिंघल म्हणाले की, हा हिंदूंना पळवून लावण्याचा कट आहे. त्यामुळेच त्यांना त्रास दिला जात आहे. यामागे केवळ एक विशेष धर्माचे लोक आहेत. पूर्वी ते ‘लव्ह जिहाद’ करत होते आणि आता ते ‘लॅण्ड जिहाद’ करू लागले आहेत. आम्ही हे सहन करणार नाही. यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात