इचलकरंजी : बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले. या सर्व आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करावी, यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री शिवजी व्यास, पंढरीनाथ ठाणेकर, दत्ता पाटील, गजानन जाधव, संजय फातले, सुधीर लिगाडे, भारत पोवार, रवी धनगर, आण्णा सुतार, महेश कोरवी, मुकुंद उरुणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात