Menu Close

सांताक्रूझ येथे अल्पवयीन हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेणारा धर्मांध फरार

सांताक्रूझ (मुंबई) : सांताक्रूझ येथे १६ वर्षांच्या हिंदु मुलीला धर्मांध ईलियास शेख याने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला कह्यात घेतले असले, तरी आरोपी धर्मांधाला अद्याप अटक केली नाही. (धर्मांधाला अटक होईपर्यंत हिंदूंनी पोलिसांचा पाठपुरावा घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलीस स्थानकात तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, पीडित मुलगी आणि धर्मांध एकाच परिसरात रहाणारे आहेत. १४ जूनच्या रात्री त्याने मुलीला भ्रमणभाष करून घराबाहेर बोलावून पळवून नेले. डिसेंबर २०१८ मध्येही त्याने तिला पळवून नेले होते. त्याही वेळी मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला अटक करून मुलीला पालकांकडे सोपवले. नंतर धर्मांधाने मुलीशी संभाषण करण्यासाठी तिला भ्रमणभाष दिला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *