२ वर्षांपूर्वी गोतस्करीच्या संशयावरून जमावाने केली होती हत्या !
- पोलीस गोतस्करांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने किंवा त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने जमावाचा उद्रेक होत आहे का, याकडेही सरकारने लक्ष द्यायला हवे !
- ‘पहलू खान याच्या हत्येनंतर तो ‘गरीब’ आणि ‘निरपराध’ असल्याचे सांगणारे त्याच्यासारख्या गोतस्करांविषयी नेहमीच मौन बाळगतात’, हे लक्षात घ्या !
अलवर (राजस्थान) : २ वर्षांपूर्वी हरियाणामध्ये गोवंश घेऊन जात असतांना गोतस्करी करत असल्याचे सांगत दूध डेअरीचा मालक असलेला पहलू खान याला जमावाने ठार केले होते. २ वर्षांनी पहलू खान आणि त्याची २ मुले यांच्यावर राजस्थान पोलिसांनी गोतस्करीचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. (घटनेच्या २ वर्षांनंतर आरोपपत्र प्रविष्ट करणार्या पोलिसांची कार्यतत्परता ! अशा पोलिसांवरही कारवाई केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या मारहाणीच्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. ते सध्या जामीनावर मुक्त आहेत. पोलिसांच्या या आरोपपत्रावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. ‘राजस्थानमधील काँग्रेस सरकार भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत आहे’, असे ते म्हणाले. (गोतस्करांविषयी ओवैसी यांना एवढा कळवळा का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, या प्रकरणाचे अन्वेषण भाजपच्या काळात चालू करण्यात आले होते. त्यानुसार आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. जर त्यात काही गडबड असेल, तर पुन्हा नव्याने अन्वेषण करण्यात येईल. (काँग्रेस सरकारने भविष्यात पहलू खान याच्यावर लावलेले सर्व आरोप मागे घेऊन त्याचा मरणोत्तर सन्मान केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
गोतस्करीकडे दुर्लक्ष करणारे पोलीस !
पहलू खान याच्या विरोधात २ वर्षांनी तो गोतस्करी करत असल्याचे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. यावरून गोतस्करीविषयी पोलीस किती असंवेदनशील आहेत, हे स्पष्ट होते. असे पोलीस गोहत्या काय रोखणार ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात