Menu Close

कुमठे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिर !

प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखवतांना डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले

कुमठे (जिल्हा सांगली) :सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कुमठे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले. डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी घेतलेल्या या शिबिरासाठी २१ महिला उपस्थित होत्या. या शिबिरात भाजणे, खरचटणे, हाताला मुका मार अथवा अस्थिभंग झाल्यास त्रिकोणी कापड कसे बांधावे याची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. याचसमवेत नाडी परीक्षण, हृदय बंद पडल्यास ते चालू कसे करावे याच्या कृती दाखवण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून पुष्कळ उपयुक्त माहिती मिळाली आणि पुढील काळात आणखी शिकण्याची इच्छाही महिलांनी व्यक्त केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *