Menu Close

कल्याणमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक

धर्मांधाला अटक करायला गेल्यावर पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक होते, हे लक्षात घ्या ! हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवून गळे काढणारे अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रसारमाध्यमेही ही वृत्ते देत नाहीत, हे जाणा !

कल्याण : येथे इराणीवाडीत कारवाईसाठी गेलेल्या साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकावर २९ जूनला दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी जाफर अली आरीफ अली सय्यदला अटक करण्यात आली. त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

इराणी टोळी ही ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याचे खोटे सांगून त्यांना लुबाडते. कल्याणच्या इराणीवाडीत चार संशयित रहात असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांचे पथक इराणीवाडीत कारवाईसाठी गेल्यावर ३५ ते ५० धर्मांध गोळा झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करणे चालू केले. पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिले. शेवटी खडकपाडा पोलिसांचे साहाय्य घेण्यात आले. या घटनेनंतर चार आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांपैकी जाफर अलीला पकडले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *