Menu Close

देहलीमध्ये धर्मांधांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत मंदिरातील मूर्तींची तोडफोड

‘जय श्रीराम’ न म्हटल्याने धर्मांधाची हत्या केल्याची अफवा पसरवून मंदिरावर आक्रमण, पोलिसांकडून केवळ ३ जणांना अटक

‘जय श्रीराम’ न म्हणणार्‍या धर्मांधांना मारहाण केल्याच्या कथित घटनांवर तोंड उघडणारे ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत मंदिरातील मूर्तींची तोडफोड करणार्‍यांच्या विरोधात मौन का बाळगून आहेत ? तसेच हिंदुविरोधी घटनांची वृत्ते प्रसारित करणार्‍या  प्रसारमाध्यमांनी मंदिरातील तोडफोडीचे वृत्त जाणीवपूर्वक दडपले आहे, हे लक्षात घ्या !

देहली : येथील चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील एका मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. ही घटना ३० जूनच्या रात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ‘सीसीटीव्ही’च्या ‘फुटेज’मध्ये हे तिघेही मंदिरामध्ये तोडफोड करत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक माध्यमातून या तोडफोडीचे अनेक ‘व्हिडिओ’ प्रसारित झाले आहेत.

१. स्थानिक हिंदूंच्या म्हणण्यानुसार येथील एका हिंदु व्यक्तीच्या घरासमोर एका धर्मांधाने त्याची गाडी उभी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला हिंदु व्यक्तीने विरोध केल्यावर त्यांच्यात वाद झाला. यानंतर धर्मांध आणि त्याचे साथीदार यांनी या हिंदूला मारहाण केली अन् त्याच्या घरात घुसून त्याची पत्नी आणि मुलगा यांनाही मारहाण केली. यानंतर ४०० ते ५०० धर्मांधांच्या जमावाने या हिंदूच्या घरासमोरील मंदिरावर आक्रमण करून त्यातील मूर्तींची तोडफोड केली. त्यांनी येथे आगही लावली.

२. येथील फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम डॉ. मुफ्ती महंमद मुकर्रम यांनी आवाहन केले आहे की, मंदिराच्या झालेल्या हानीची मुसलमानांनी भरपाई करावी.

३. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि देहलीतील खासदार डॉ. हर्षवर्धन यांनी २ जुलै या दिवशी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ‘ही घटना दुर्दैवी आणि दुःखद आहे. तोडफोड करणारे क्षमा करण्यायोग्यही नाहीत’, असे म्हटले.

आमदार कपिल मिश्रा यांच्याकडून तोडफोडीचे व्हिडिओ प्रसारित

१. या घटनेविषयी देहलीतील आमदार आणि माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी २ व्हिडिओ ‘पोस्ट’ करून ट्वीट केले आहे की, हा पाकिस्तान नाही, तर देहलीतील चावडी बाजारातील हिंदूंचे मंदिर आहे. ही घटना ३० जूनची आहे. एका विशिष्ट धर्माच्या जमावाने मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली. हे कृत्य गुंडांनी नाही, तर शेकडोंच्या संख्येने स्थानिक लोकांच्या जमावाने केलेले कृत्य आहे. त्यांनी त्यांच्या धर्माच्या घोषणा देत मंदिराचे टाळे तोडले.

२. कपिल मिश्रा यांनी या घटनेचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, देहलीच्या हौजकाजीमध्ये एका मंदिरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. या घटनेच्या पूर्वी येथे अफवा पसरवण्यात आली होती की, मुसलमान तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली. या तरुणाला बलपूर्वक ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगण्यात आले होते. ही अफवा पसरल्यानंतर धर्मांधांच्या जमावाने मंदिरावर आक्रमण केले आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गोंधळ घातला.

३. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एका षड्यंत्राद्वारे ही अफवा पसरवण्यात आली.

हिंदूंविषयी संवेदनशून्य असलेले पोलीस !

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील मूर्तींच्या तोडफोडीच्या घटनेनंतर एक घंट्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. (अन्य पंथियांच्या धार्मिक स्थळी अशी घटना घडली असती, तर पोलिसांनी अशीच संथगतीने कृती केली असती का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तत्पूर्वी मोठ्या संख्येने धर्मांधांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. (पोलिसांनाही न घाबरणारे धर्मांध ! सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे अतीलांगूलचालन केल्यामुळे ते उद्दाम झाले आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *