जम्मू : विश्व हिंदु परिषद दुसर्या धर्मामध्ये विवाह करण्याच्या विरोधात नाही मात्र एका षड्यंत्राद्वारे मुसलमान युवकांकडून हिंदु युवतींशी केल्या जाणार्या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आहे. मुसलमान तरुण हिंदु युवतींचा लाभ घेतात आणि त्यांचे नंतर धर्मांतर करतात, असे विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी येथे सांगितले. ते येथे विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीच्या समारोपाच्या वेळी बोलत होते. या बैठकीत ‘लव्ह जिहाद’वरही चर्चा करण्यात आली, तसेच अयोध्येत राममंदिर लवकरात लवकर बांधण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षपदी विहिंपचे अध्यक्ष विष्णु कोकजे होते, तर २२५ वरिष्ठ पदाधिकारी यात सहभागी झाले होते.
विनोद बंसल यांनी मांडलेली सूत्रे
१. या बैठकीत गोहत्येच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच हिंदूंना पूजनीय असणार्या गोमातेच्या संरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली.
२. जमावाकडून होणार्या हत्यांच्या घटना अतिशयोक्तीद्वारे सांगण्यात येत आहेत. अनेकदा अशा घटनांमागील कारण नंतर वेगळेच असल्याचे समोर येते. अन्य धर्मियांनी गायीच्या संदर्भातील हिंदूंच्या धार्मिक भावनांचा सन्मान केला पाहिजे. गाय सर्वांसाठी लाभदायक आहे.
३. गोरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्या गोरक्षक किंवा अन्य कोणाकडूनही होणार्या हिंसेचा आम्ही निषेधच करतो; मात्र गोरक्षकांवर करण्यात येणार्या अन्यायाविषयी किंवा गायींवरील अत्याचारांविषयी कोणीही बोलत नाही.
४. गोरक्षक पशूंच्या संरक्षणाचे कार्य करतात. त्यांच्याकडून एखाद्याची हत्या करण्याची कल्पना करता येत नाही.
५. काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये २४ वर्षीय तबरेज याचा दुचाकी चोरीवरून जमावाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. हा मृत्यू संशायस्पद आहे. याकडे केवळ गुन्हेगारी दृष्टीकोनातून पहायला हवे.
मंदिरांचा पैसा हिंदूंच्या कल्याणासाठीच खर्च व्हावा !
बंसल म्हणाले की, दक्षिण भारतातील काही मंदिरांतील व्यवस्थापन समितीमध्ये ख्रिस्ती मिशनरींची नियुक्ती करण्यात आली आहे. या कथित परंपरेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. मंदिरांचा पैसा केवळ हिंदूंच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments