सातारा : संत भक्तराज महाराज यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अत्यंत महान असून खर्या अर्थाने राष्ट्र अन् धर्म रक्षणकर्ते आहेत. येणारा काळ हा अत्यंत वाईट असून गुरुदेव साधक आणि समाज यांच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. तसेच हिंदु समाजाचे संघटन करून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे महान कार्य त्यांच्याकडून लीलया करवून घेत आहेत. परात्पर गुरु केवळ सनातनचे संस्थापक असले, तरी ते अखिल विश्वाचे आहेत. सनातन संस्थेचे महत्त्व शब्दांत सांगता येणार नाही. सनातनचे कार्य अवर्णनीय आणि समाजाला दिशा देणारे आहे, असे गौरवोद्गार आैंध (जिल्हा सातारा) येथील प.पू. हिरापुरी महाराज मठाचे मठपती पू. श्यामपुरी महाराज यांनी काढले.
सातारा येथे १६ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सातारा-कोरेगाव रस्त्यावर असलेल्या वेदभवन मंगल कार्यालय येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या प्रसारासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी वडूज येथील सनातनचे साधक श्री. हंसराज पटेल आणि श्री. रामभाऊ गोडसे उपस्थित हाते. पू. श्यामपुरी महाराज यांनी सनातनच्या साधकांची भेट झाल्यावर विशेष आनंद झाल्याचे सांगितले. तसेच सनातनच्या पुढील कार्याला शुभाशीर्वाद दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात